मी आणि माझे रिकामटेकडे उद्योग! रिकामा वेळ हा कधी कधी जास्तच कंटाळवाणा व्हायला लागतो. सतत काम करून करून एक दिवस पूर्ण रिकामा असेल तर तो झोपण्यात जातो किंवा काहीतरी मोबाईल सर्फिंग वर जातो. मला हे दोन्ही चांगलं जमत नसल्यामुळे माझा रिकामा वेळ असाच जातो. पण ज्यावेळी असे लागोपाठ दोन दिवस एकत्र रिकामे आले की सगळाच सत्यानाश. घरी आई सांगेल ती कामं निमूटपणे करा ( बायको हे पात्र घरच्या नाटकात आलं नसल्यामुळे अजून आईच कामं सांगते ), काहीतरी फडतूस इथे तिथे टाईमपास करा हे उद्योग करावे लागतात. बरे पुस्तकं वाचणं हा आवडता छंद जरी असला तरी आता घरी आहेत ती पुस्तकं वाचली आहेत आणि बाहेरून जाऊन पुस्तकं आणण म्हणजे घरात अडचण वाढवणं असं समीकरण झाल्यामुळे तेही सध्या बंदच आहे. अश्यावेळी उगाच खिडकीतून बाहेर बघत बसणं हा सुद्धा एक ऑप्शन असतो, पण असं खिडकीबाहेर बघत बसलो की उगाच तर थ्री इडियट मधली राजूची बहीण कशी बसायची ते आठवतं, त्यामुळे तेही नाही. हल्ली रस्त्यावर मारामाऱ्या - भांडणं वगैरे पण होत नसल्यामुळे तेही मनोरंजन आताशा होत नाही. आळस नावाची गोष्ट या दिवसांत इतकी भिनत जातो की हार्मोनियम सारखं इतकं सुर...
Posts
- Get link
- X
- Other Apps
शिवचरित्र निबंधावली भाग - ३ राजेपणाची मीमांसा - मध्ययुगात सर्वत्र अस्थिरतेचे वातावरण होते . आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी स्थानिक लोक बलवान होत होते . हे लोक फक्त त्यांच्या प्रदेशापुरतेच बलवान असत व त्यामुळे सरसकट सगळेच स्वतःला राजे म्हणवून घेत असत ., त्याला बाहेर काही किंमत नसे कारण तत्कालीन कुठल्याही बलिष्ठ सत्तेने जर त्या व्यक्तीच्या राजेपणास मान्यता दिली तर ते अधिकृत मानले जाई . त्यावेळी निजामशाही , आदिलशाही , कुतुबशाही आणि मुघल ह्या सत्ता राज्य करत होत्या . त्यांनी जर कोणाला राजे म्हणून मान्यता दिली किंवा कोणाला अशी राजा अशी किताबत दिली तर ती साधारणपणे कायम चालत असे . म्हणजे जेव्हा अहमदनगरची निजामशाही नष्ट झाली तेव्हा त्या सत्तेने दिलेली वतने किंवा ' किताब हे त्या नंतरही चालू राहिले होते . पुढे कुतुबशहाने व आदिलशाहीने मुघलांचं मांडलिकत्व स्वीकारलं व त्यामुळे मुघल हेच भारताचे सार्वभौम सत्ताधीश झाले व त्यांच्या मान्यतेला ...
- Get link
- X
- Other Apps
शिवचरित्र निबंधावली भाग - २ निजामशाहीतील धामधूम- निजामशाहीतील गादीची मालकी एकाच घराण्याकडे असावी ह्यावर एकमत असल तरी त्यांच्यातील कोणी गादीवर बसायचे ह्यावर काहीच नियम नसल्याने दरबारातील गटांमध्ये यांवरून कायम झगडे होत. अशी परिस्थिती मध्ययुगात सर्वत्रच होती, अगदी मराठेशाहीत सुद्धा ह्यावरून संघर्ष झाले त्यामुळे ह्या स्थितीत काहीच नावीन्य नाही. प्रत्येक गटाला त्यांच्या पसंतीचा बादशहा हवा असल्याने त्यांचे इतर गटांशी नेहमीच भांडण होई व त्यातून रक्तरंजित संघर्ष सुद्धा होत. आदिलशाहीतील वजीर दिलावर खानाने आदिलशहाच्या बहिणीचे मुर्तुझा निजामशहाच्या मुलाशी म्हणजे हुसेनशी लग्न करण्याचे ठरवले पण निजामशहा सुरुवातीला तयार झाला नाही पण त्यातून आदिशही व निजामशाहीत युद्ध सुरू झाले शेवटी निजामशहा तयार झाला पण त्याने आपल्या मुलाचाच काटा काढण्याचे ठरवले. एके दिवशी हा मुलगा झोपलेला असताना त्याने त्याचा पलंग पेटवून दिला पण हा हुसेन त्यातून बचावला. त्याने ह्या प्रकरणाचा सूड म्हणून आपल्या बापालाच आधणाच्या हाडयात बुडवून मारले व स्वतः बादशहा बनला. त्याच्या क्रूरपणामुळे लवकरच त्याचा ...
- Get link
- X
- Other Apps
शिवचरित्र निबंधावली भाग १ शिवचरित्र निबंधावली हे मराठी इतिहास संशोधन साहित्यातील एक महत्वाचे साधन. त्यावरची ही लेखमालिका. ह्या लेखमालिकेत ह्या निबंधावलीचा अनुक्रम दोन घेण्यात आला असून ह्याचे संपादन न. चिं. केळकर व द. वि. आपटे ह्यांनी केले आहे. ह्या लेखमालिकेतून आपण शिवचरित्राचा आपल्या कुवतीनुसार अभ्यास करणार आहोत, ह्यात कुठेही एकांगी भूमिका न घेता निःपक्षपातीपणे लिखाणाचा प्रयत्न करून एक उपयुक्त मालिका सादर करता यावी यासाठी प्रयत्न करू. ह्यातून ह्या लेखांमधून आलेली माहिती, त्याचे विश्लेषण , कधी कधी आपली मते यांचेही स्पष्टीकरण करू. भोसल्यांचे राजपूतत्व :- शिवाजी महाराज शिसोदिया राजपूत होते हा एक सार्वत्रिक समज आहे. निबंधववलीत सुद्धा शिवभारत, सभासद बखर, गागाभट्ट, जयसिंग यांचे दाखले दिले आहेत पण शिवभारत ते सूर्यवंशी असल्याचे सांगते तर सभासद बखर फक्त ते शिसोदिया वंशाचे राजपूत असल्याचा उल्लेख करते. ह्यात महाराजा जयसिंगाच्या एका पात्रातील उद्गार दिले आहे ज्यात तो भोसल्यांशी सोयरीक करण्यासाठी सांगण्यात आले तर ती करेन असे म्हणतो पण त्याच पत्रात तो हे घराणे अतिशय हीन असल्यान...
- Get link
- X
- Other Apps
इतिहास संशोधन आणि मी इतिहास संशोधन म्हटलं कि अनेकांच्या पोटात गोळा येतो . पण मला लहानपणापासून ह्याच गोष्टीचा जास्त आकर्षण वाटते . लहानपणापासून मी आपल्या मराठीतील सर्व ऐतिहासिक कादंबऱ्या मराठी रियासत चे सर्व खंड , बाबासाहेब पुरंदरे यांचे राजा शिव छत्रपती इ . पुस्तके मी आवडीने वाचत आलो आहे . सध्या लॉकडाउन च्या काळात माझ्या वाचनात एक पुस्तक वाचनात आला ते म्हणजे शिव चरित्र निबंधावली . त्यानंतर मी माझे ह्या क्षेत्रातील मार्गदर्शक संजय क्षीरसागर सरांशी चर्चा केली आणि एक धाडसी उपक्रम हाती घेत आहे तो म्हणजे ह्या शिव चरित्र निबंधावली वर एक लेख मालिका लिहिण्याचा . कितपत जमेल माहित नाही पण ह्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे . इतिहास संशोधन हा एक नवा प्रांत आहे कारण आपल्याकडे इतिहास हि खूप संवेदनशील पण तितकीच जास्तीत जास्त विकृत केलेली गोष्ट आहे त्यामुळे खूप सांभाळून लिहावं लागणार आहे . ह्यात एकाच दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न मी करणार आहे ...
- Get link
- X
- Other Apps
कोरोना, पॉझिटिव्हिटी आणि मी काय कुठला तो दिसूही न शकणारा विषाणू आला आणि त्यानं सगळं जग एका क्षणात बंद करून टाकलं. कधीही बंद न होणारी मुंबई सुद्धा एका झटक्यात बंद झाली. माझंही ऑफीस बंद असल्यामुळे आम्हांला घरीच थांबायची वेळ आली. घरातील सगळी माणसं घरातच थांबली, बाहेर पडणं बंद झालं, बाहेर पडायचा आणि पोलिसांचे दणके खाऊन घरी यायचा असं काहीतरी होईल म्हणून बाहेर जाणंच नको असं काहीतरी व्हायला लागला. सतत बातम्यांमध्ये दाखवली जाणारी मृत्यूंची, रोग्यांची वाढती संख्या यांमुळे आपला पण नंबर त्यात लागेल काय ? अशी भीतीही तयार बी=व्हायला लागली. घरात कधी नव्हे ते लॉकडाउन चुकीचा कि बरोबर, उद्धव ठाकरे खरंच चांगलं काम करत आहेत कि मोदी? दिवे लावणे, थाळ्या वाजवणे यांनी काही फरक पडेल का अश्या चर्चा रंगू लागल्या. थोड्याफार प्रमाणात भांडणे झाली. नंतर हळूहळू ह्या सगळ्याची जागा वैतागाने आणि चिंतेने घेतली, आपल्या नोकऱ्यांचं काय होणार? राहणार कि जाणार? ह्या चिंतांनी मनात खळबळ माजू लागली आहे. कधी घराबाहेर पडायचा प्रसंग आलाच तर बाहेर दिसणारी दृश्य त्या दुकानांसमोरच्या रांगा घरी आलं कि लगेच हात- पाय ...
- Get link
- X
- Other Apps
कोरोना संसर्ग आणि भारतीय आर्थिक समतोल सध्या भारतात कोरोना विषाणूची मोठी साथ पसरली आहे . भारत सध्या लॉकडाउन च्या स्थितीत आहे . हा लेख जेव्हा लिहिला जात आहे तेव्हा भारत सरकारने हा काळ ३ मे पर्यंत वाढविला आहे . भारतातील ह्या स्थितीचे प्रचंड असे दूरगामी परिणाम भारतातील सर्वच आर्थिक , सामाजिक क्षेत्रांवर होणार असून त्यातील आर्थिक परिणामांचा आज आपण विचार करू . भारत सरकारने २४ मार्च ते १४ एप्रिल असा पहिला लॉकडाउन जाहीर केला , ह्या काळात कोरोना चे बाधीत कमी होणे अपेक्षित होते पण तसे न झाल्यामुळे भारतात दिवसागणिक चिंता जास्त वाढत चालली आहे . भारतातील आर्थिक दृष्ट्या महत्वाची शहरे म्हणजे पुणे , मुंबई , इंदूर , दिल्ली इ . यात आघाडीवर आहेत व येथे रुग्ण जास्त सापडले आहेत . त्यामुळे देशाच्या विविध भागांतून येथे येणारे मजूर तसेच सुशिक्षितांचे लोंढे आता कामाविना किंवा वर्क फ्रॉम होम स्थितीत आहेत . बऱ्याच कंपन्या बंद स्थितीत असून त्यांच्या चालकांच्या मनात झालेले नुक...