Posts

Showing posts from August, 2019
स्वातंत्र्य   लढ्या पासून आपण काय शिकलो ?       यंदा आपण आपल्या स्वातंत्र्याच्या ७३व्या वर्षात पदार्पण केले . या पार्शवभूमीवर आपल्या आजच्या स्थितीचा विचार करणे व त्याचा इतिहासात कुठे संदर्भ मिळतो का ह्याचा विचार करायला हवा . ह्याचं    कारण म्हणजे आपल्या ' आज ' चा विचार करताना त्याची मुळे   इतिहासात आहेत ह्याचा आपल्याला विचार   करायला हवा .      आपल्या स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी योगदान दिले . अनेक महान नेत्यांच्या तसेच लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आपल्या स्वातंत्र्य लढ्याला यश प्राप्त होऊन आपले पारतंत्र्य गेले . पण ह्या सगळ्या गोष्टींचा उदोउदो करताना आपण एक गोष्ट मात्र     विसरलो ती म्हणजे आपल्या स्वातंत्र्य चळवळी बरोबर झालेल्या   सामाजिक व आर्थिक सुधारणा , आज त्याचाच जास्त विचार होणं गरजेचं आहे कारण आता उभ्या असलेल्या आव्हानांचा सामना करायचा असेल तर आपल्याला ह्याच गोष्टीची जास्त गरज आहे . ...
      आम्ही जागं व्हायलाच हवं आज आसपास वावरताना असंख्य प्रश्नांची वावटळे उठताना दिसतात . आपल्या आजूबाजूला सतत कसल्यातरी दाहक वादळांची नांदीच होताना दिसते . रोज पेपर उघडला कि पहिल्या पानावर ज्या बातम्या असतात त्या वाचून आपल्या देशात नेमकं चाललंय काय याचाच प्रश्न पडतो . कुठे सुरु असलेले झुंडबली , बलात्कार , ऑनर किलिंग ह्यांसारख्या बातम्या आणि त्यांना जोड द्यायला रोज सीमेवर घडणारे जवानांचे मृत्यू आणि ह्या सर्वांवर वरकड म्हणजे वरील सर्व गोष्टींबद्दल राजकारण्यांकडून दाखवली जाणारी संतापजनक अनास्था . ह्या सर्व गोष्टींनी डोकं सुन्न होऊन जाते . पण ह्या सर्व गोष्टी वाचल्या - ऐकल्या नंतर एक प्रश्न मात्र कायम घुमत राहतो तो म्हणजे आपण नेमका करतोय काय ? ह्या सर्व गोष्टींबद्दल कुठेतरी देशाच्या कोपऱ्यात एक क्षीण आवाज उठतो आणि मग परत सगळं जैसे थे होत . असं का होतंय ? आपण नेमका करतोय काय ? मागे दिल्लीत निर्भया हत्याकांड झालं तेव्हा दिल्लीत तरुणांचे असंख्य मोर्चे निघाल...