शिवचरित्र निबंधावली भाग -

राजेपणाची मीमांसा -  मध्ययुगात सर्वत्र अस्थिरतेचे वातावरण होते. आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी स्थानिक लोक बलवान होत होते. हे लोक फक्त त्यांच्या प्रदेशापुरतेच बलवान असत त्यामुळे सरसकट सगळेच स्वतःला राजे म्हणवून घेत असत., त्याला बाहेर काही किंमत नसे कारण तत्कालीन कुठल्याही बलिष्ठ सत्तेने जर त्या व्यक्तीच्या राजेपणास मान्यता दिली तर ते अधिकृत मानले जाई. त्यावेळी निजामशाही, आदिलशाही , कुतुबशाही आणि  मुघल ह्या सत्ता राज्य करत होत्या. त्यांनी जर कोणाला राजे म्हणून मान्यता दिली किंवा कोणाला अशी राजा अशी किताबत दिली तर ती साधारणपणे कायम चालत असे. म्हणजे जेव्हा अहमदनगरची निजामशाही नष्ट झाली  तेव्हा त्या सत्तेने दिलेली वतने किंवा 'किताब हे त्या नंतरही चालू राहिले होते. पुढे कुतुबशहाने आदिलशाहीने मुघलांचं  मांडलिकत्व स्वीकारलं त्यामुळे मुघल हेच भारताचे सार्वभौम सत्ताधीश झाले त्यांच्या मान्यतेला अधिकृतता निर्माण झाली. मुघलांनी मान्यता दिलेली सत्ताच अधिकृत असल्याने पुढे संभाजीपुत्र शाहू ताराराणी ह्यांच्यात जे युद्ध झालं ते प्रामुख्याने ह्या मान्यतेसाठीच होत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भोसले घराणं  सुद्धा स्वतःला राजे म्हणवून घेत असे पण पुढे शहाजीस अदिलशाहीकडून महाराजा हि पदवी प्राप्त झाली तसेच पुरंदर तहाच्या वेळी शिवाजी महाराजांना मुघलांकडून राजा हि पदवी मिळाली त्यामुळे हे घराणं  इतर घराण्यांपेक्षा दर्जाने मोठं ठरलं. शहाजीराजांच्या पूर्वीसुद्धा भोसल्यांचा उल्लेख हा राजे असाच येतो पण ते इतर लोकांसारखंच असावं. थोडक्यात म्हणजे स्वतःला आहे म्हणवणारे खूप लोक होते त्यांना कधी कधी बादशहांकडून मान्यता पण मिळत असे. नंतर शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करवून घेऊन सार्वभौम सत्ताधीश म्हणून स्वतःला मान्यता मिळवून घेतली.

शहाजी-  शहाजी ह्या व्यक्तीबद्दल फारसं संशोधन झालं आहेस म्हणता येत नाही कारण बखरींमधूनही फारशी माहिती उपलब्ध होत नाही.
आज भरपूर कागदपत्रे उपलब्ध असल्याने शहाजीच्या चरित्रावर पुष्कळसा प्रकाश टाकता येत असला तरी अजून संशोधन होणे आवश्यक आहे. सभासद बखर किंवा चिटणीस बखर ह्या शहाजीच्या नंतर खूप वर्षांनी लिहिल्या गेल्या असल्याने त्यांमध्ये शहाजी बद्दल फार कमी माहिती मिळते. आज संपूर्ण पणे  कागदपत्रांवर भिस्त ठेवून आपल्याला संशोधन करावे लागते आज त्यात आपण बरेच यशस्वी सुद्धा झालो आहोत.

                                              क्रमशः

Comments

Popular posts from this blog