नव्या युगाच्या उंबरठ्यावर आर्थिक मंदी , त्याची कारणे , त्याचे परिणाम हे आपण मागील दोन लेखांत पहिले आता त्यावरच्या उपायांची चर्चा करू . ह्यात काही त्रुटी असू शकतात . कारण हे लेखकाचे स्वतःचे मत आहे . प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते त्यामुळे ह्या गोष्टींवर विचारमंथन व्हावे म्हणून हा एक छोटासा प्रयत्न . भारताला ह्या मंदीच्या खाईतून बाहेर पाडण्यासाठी काही ठोस पावले उचलण्याची गरज आहे त्यांचे परिणाम कदाचित दूरगामी होण्याची शक्यता आहे आणि त्या उपायांच्या अंमलबजावणीमुळे भारतातील आताचे वातावरण कदाचित ढवळून निघेल . तसं बघायला गेले तर भारत आता परत तीस वर्षांपूर्वीच्या परिस्थितीत पोहोचला आहे . त्यावेळी सुद्धा भारतीय अर्थव्यवस्था संकटात होती आताही आहे त्यावेळीही तश्या स्थितीला देशातील व देशाबाहेरील कारणे होती तशीच आतासुद्धा आहेत व त्या वाईट परिस्थितीतूनच मग आर्थिक उदारीकरणाचे वारे वाहायला लागले व भारत अधिकच सशक्त बनत गेला . आतासुद्धा अश्याच एका नव्या संकल्पने...
Posts
Showing posts from October, 2019
- Get link
- X
- Other Apps
आर्थिक मंदी - कारणे मागील लेखात आपण आर्थिक मंदी म्हणजे काय ? ती कश्या प्रकारे भारतात आजच्या घडीला अस्तित्वात आहे हे बघितले . आता हि परिस्थिती नेमकी कशी अस्तित्वात आली त्याची नेमकी काय कारणे असू शकतात याचा विचार करायला हवा . पुन्हा एकदा आपण सहज समोर दिसणारे लोकांत चर्चिले जाणारे सर्व मुद्दे बघूया . आपण रोज वर्तमानपत्रे , टीव्ही वरील बातम्या वगैरें मधून जे ऐकतो वाचतो त्याच ढोबळ मुद्द्यांचा विचार करूया . इथे पहिले एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे कि कुठल्याही अर्थव्यवस्थेत कुठच्याच गोष्टी एकदम उद्भवत नाही तिला आधीपासून घडणाऱ्या खूप गोष्टी कारणीभूत असतात . त्यात देशातील व तसेच देशाबाहेरील बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात . पहिले देशाबाहेरील गोष्टी घेऊ . पहिले २००८ साली अमेरिकेत आर्थिक संकट जे आलं त्याचे जगभर पडसाद उमटले आणि त्या धक्क्यातून कित्येक अर्थव्यवस्था अजूनही सावरल्या नाहीयेत तो धक्का काय होता किंवा त्या धक्क्याचे नेमके परिणाम त्याची कारणे हा...