Posts

Showing posts from April, 2020
कोरोना संसर्ग आणि भारतीय आर्थिक समतोल सध्या भारतात कोरोना विषाणूची मोठी साथ पसरली आहे . भारत सध्या लॉकडाउन च्या स्थितीत आहे . हा लेख जेव्हा लिहिला जात आहे तेव्हा भारत सरकारने हा काळ ३ मे पर्यंत वाढविला आहे . भारतातील ह्या स्थितीचे प्रचंड असे दूरगामी परिणाम भारतातील सर्वच आर्थिक , सामाजिक क्षेत्रांवर होणार असून त्यातील आर्थिक परिणामांचा आज आपण विचार करू . भारत सरकारने २४ मार्च ते १४ एप्रिल असा पहिला लॉकडाउन जाहीर केला , ह्या काळात कोरोना चे बाधीत कमी होणे अपेक्षित होते पण तसे न झाल्यामुळे भारतात दिवसागणिक चिंता जास्त वाढत चालली आहे . भारतातील आर्थिक दृष्ट्या   महत्वाची शहरे म्हणजे पुणे , मुंबई , इंदूर , दिल्ली   इ . यात आघाडीवर आहेत व येथे रुग्ण जास्त सापडले आहेत . त्यामुळे देशाच्या विविध भागांतून येथे येणारे मजूर तसेच सुशिक्षितांचे लोंढे आता कामाविना किंवा वर्क फ्रॉम होम स्थितीत आहेत . बऱ्याच कंपन्या बंद स्थितीत असून त्यांच्या चालकांच्या मनात झालेले नुक...