कोरोना, पॉझिटिव्हिटी आणि मी
काय कुठला तो दिसूही न शकणारा विषाणू आला आणि त्यानं सगळं जग एका क्षणात बंद करून टाकलं. कधीही बंद न होणारी मुंबई सुद्धा एका झटक्यात बंद झाली. माझंही ऑफीस बंद असल्यामुळे आम्हांला घरीच थांबायची वेळ आली. घरातील सगळी माणसं घरातच थांबली, बाहेर पडणं बंद झालं, बाहेर पडायचा आणि पोलिसांचे दणके खाऊन घरी यायचा असं काहीतरी होईल म्हणून बाहेर जाणंच  नको असं काहीतरी व्हायला लागला. सतत बातम्यांमध्ये दाखवली जाणारी मृत्यूंची, रोग्यांची वाढती संख्या यांमुळे आपला पण नंबर त्यात लागेल काय ? अशी भीतीही तयार बी=व्हायला लागली. घरात कधी नव्हे ते लॉकडाउन चुकीचा कि बरोबर, उद्धव ठाकरे खरंच चांगलं काम करत आहेत कि मोदी? दिवे लावणे, थाळ्या वाजवणे यांनी काही फरक पडेल का अश्या चर्चा रंगू लागल्या. थोड्याफार प्रमाणात भांडणे  झाली. नंतर हळूहळू ह्या सगळ्याची जागा वैतागाने आणि चिंतेने घेतली, आपल्या नोकऱ्यांचं  काय होणार? राहणार कि जाणार? ह्या चिंतांनी मनात खळबळ माजू लागली आहे. कधी घराबाहेर पडायचा प्रसंग आलाच तर बाहेर दिसणारी दृश्य त्या दुकानांसमोरच्या रांगा घरी आलं कि लगेच हात- पाय धुणं इ. ह्या सगळ्यातून कधी बाहेर ह्या चिंतेतून बाहेर पडून काहीतरी पॅझिटिव्ह शोधलं पाहिजे म्हणून प्रयत्न सुरु केले आणि खरंच खूप गोष्टी नव्याने सापडायला लागल्या.
सर्वप्रथम स्वतःला वेळ द्यायला शिकलो. आपल्या नकळत आपण आपल्याच भोवतीच्या आशा- अपेक्षांच्या वर्तुळात हरवून जातो आणि स्वतःकडे दुर्लक्ष करतो. सध्या ह्या साठी खूप वेळ मिळाल्या मुळे खूप गोष्टी समजल्या उदा. मी हार्मोनियम खरंच बऱ्यापैकी वाजवायला लागलो आहे हे मला आताच कळलं. भरपूर वाचन, घरातली कामं  यांना वेळ देता यायला लागल्यामुळे आपण घरातल्या गोष्टींसाठी उपयोगी आहोत हे कळलं. स्वयंपाक वगैरे गोष्टी शिकायला लागलो, माझ्या बऱ्याच गोष्टींवर काम करता आलं. घरात आजकाल एखादा साईड बिजनेस करता येऊ शकतो का ह्याचाही चर्चा रंगू लागल्या आहेत हि खूपच चांगली गोष्ट आहे. आपल्या आजूबाजूच्या परिसराची नव्याने ओळख झाली. नव्याने उगवणाऱ्या रोपट्यापासून कुठले चांगले उद्योग सुरु करता येऊ शकतात हे कळायला लागले आहे.
कमी अधिक फरकाने हीच गोष्ट तुमच्याही आयुष्यात घडत असावी, नसेल तर घडवायला सुरुवात करायला हवी. आज सगळं भारत याच मार्गाने जायला हवा. आज आपल्या किती बदल घडत आहेत त्यांची ओळख करून घ्यायला हवी. आता आपण कधी नव्हे ते स्वतःची खूप काळजी घ्यायला लागलो आहोत. एवढंच नव्हे आपला पर्यावरण वगैरे गोष्टींची काळजी करायला लागलो आहोत. आज आपल्याकडे आहेत त्याच गोष्टींत कसे दिवस काढायचे वायफळ खर्च टाळून आर्थिक शिस्तीने आपल्याला राहता येते हे आपल्याला कळायला लागले आहे. आहे त्या परिस्थितीतून सकारात्मकतेने मार्ग काढून पुढे जायचा आपण सर्वच जण करतो आहोत हि चांगली गोष्टच नाही का? पण हे  सगळं ज्यांच  पोट भरलेलं आहे त्यांनाच शक्य आहे पण ज्यांना दोन वेळची भ्रांत आहे त्यांचा पण विचार पण आपल्याला करायला हवा आणि ती जाणीव आपल्याला झाली तरच ह्या काळाचा फायदा आपल्याला झाला असा म्हणता येईल. आज भारताला आर्थिक महासत्ता होण्याची संधी आहे अस म्हणत आहेत पण ते होण्यासाठी हा काळ उपकारक ठरेल असं दिसतंय. कारण एक प्रकारे आर्थिक दृष्टीने जवाबदार आणि संवेदनशील नागरिक हीच खरी शक्ती आहे आणि तीच महासत्ता बनण्याची गुरुकिल्ली आहे.

Comments

Popular posts from this blog