Posts

Showing posts from June, 2020
शिवचरित्र निबंधावली भाग - २ निजामशाहीतील धामधूम- निजामशाहीतील गादीची  मालकी एकाच घराण्याकडे असावी ह्यावर एकमत असल तरी त्यांच्यातील कोणी गादीवर बसायचे ह्यावर काहीच नियम नसल्याने दरबारातील गटांमध्ये यांवरून कायम झगडे होत. अशी परिस्थिती मध्ययुगात सर्वत्रच होती, अगदी मराठेशाहीत सुद्धा ह्यावरून संघर्ष झाले त्यामुळे ह्या स्थितीत काहीच नावीन्य नाही. प्रत्येक गटाला त्यांच्या पसंतीचा बादशहा हवा असल्याने त्यांचे इतर गटांशी नेहमीच भांडण होई व त्यातून रक्तरंजित संघर्ष सुद्धा होत. आदिलशाहीतील वजीर दिलावर खानाने आदिलशहाच्या बहिणीचे मुर्तुझा निजामशहाच्या मुलाशी  म्हणजे हुसेनशी लग्न करण्याचे ठरवले पण निजामशहा सुरुवातीला तयार झाला नाही पण त्यातून आदिशही व निजामशाहीत युद्ध सुरू झाले शेवटी निजामशहा तयार झाला पण त्याने आपल्या मुलाचाच  काटा काढण्याचे ठरवले. एके दिवशी हा मुलगा झोपलेला असताना त्याने त्याचा पलंग पेटवून दिला पण हा हुसेन त्यातून बचावला. त्याने ह्या प्रकरणाचा सूड म्हणून आपल्या बापालाच आधणाच्या हाडयात बुडवून मारले व स्वतः बादशहा बनला. त्याच्या क्रूरपणामुळे लवकरच त्याचा ...