शिवचरित्र निबंधावली भाग १
शिवचरित्र निबंधावली हे मराठी इतिहास संशोधन साहित्यातील एक महत्वाचे साधन. त्यावरची ही लेखमालिका. ह्या लेखमालिकेत ह्या निबंधावलीचा अनुक्रम दोन घेण्यात आला असून ह्याचे संपादन न. चिं. केळकर व द. वि. आपटे ह्यांनी केले आहे. ह्या लेखमालिकेतून आपण शिवचरित्राचा आपल्या कुवतीनुसार अभ्यास करणार आहोत, ह्यात कुठेही एकांगी भूमिका न घेता निःपक्षपातीपणे लिखाणाचा प्रयत्न करून एक उपयुक्त मालिका सादर करता यावी यासाठी प्रयत्न करू. ह्यातून ह्या लेखांमधून आलेली माहिती, त्याचे विश्लेषण , कधी कधी आपली मते यांचेही स्पष्टीकरण करू.
भोसल्यांचे राजपूतत्व :- शिवाजी महाराज शिसोदिया राजपूत होते हा एक सार्वत्रिक समज आहे. निबंधववलीत सुद्धा शिवभारत, सभासद बखर, गागाभट्ट, जयसिंग यांचे दाखले दिले आहेत पण शिवभारत ते सूर्यवंशी असल्याचे सांगते तर सभासद बखर फक्त ते शिसोदिया वंशाचे राजपूत असल्याचा उल्लेख करते. ह्यात महाराजा जयसिंगाच्या एका पात्रातील उद्गार दिले आहे ज्यात तो भोसल्यांशी सोयरीक करण्यासाठी सांगण्यात आले तर ती करेन असे म्हणतो पण त्याच पत्रात तो हे घराणे अतिशय हीन असल्याने मी कुठलेच संबंध ठेवणार नाही असेही म्हणतो त्यामुळे हे पात्रच संशयास्पद ठरते जिज्ञासूंनी ह्यावर अधिक प्रकाश टाकावा. भीमसेन सक्सेना, खाफीखान हे सुद्धा भोसले हे राजपूत घराण्याचे पण हीन जातीचे असल्याचे नमूद करतात. ह्या सगळ्यावरून एक निष्कर्ष निघू शकतो तो म्हणजे भोसल्यांच्या राजपूत पणाबद्दल बऱ्यापैकी विस्कळीतपणे माहिती उपलब्ध आहे. सभासद बखर विश्व्सनीय असली तरी ती राजारामाच्या काळात लिहिली असल्याने तेव्हा ह्याबद्दल खरी माहिती कितपत असेल ह्याबद्दल शंका आहे. बाकीची कुठचीच साधने नक्की माहिती देत नाहीत. तेव्हा जिज्ञासूंनी ह्यावर आणखी प्रकाश टाकावा.
भोसल्यांचा पूर्वानुक्रम:- मालोजी व विठोजिचे पूर्वज हे निजामशाहीत चांभारगोंदे, वैजापूर येथे वतने सांभाळत होते. डफने हे लोक दरोडेखोर असल्याचा उल्लेख केला आहे पण तो खोटाच आहे हे उघड झाले आहे. ह्या दोन्ही बंधूंच्या जन्म व तसेच इतर पूर्वायुष्याबद्दल फारशी माहिती मिळत नाही. मालोजीचे लग्न हे फलटणच्या निंबाळकर घराण्यातील दिपाबाई हिच्याशी झाले. इतर मराठे कुळांच्या उदयाला जी परिस्थिती कारणीभूत ठरली तीच ह्या दोन बंधूंच्या उदयाला कारणीभूत ठरली. राक्षसतागडीच्या युद्धात विजयनगर राज्य नामशेष झाल्यावर सगळ्या शाह्यांमधे आपापसांत युद्धे व्हायला लागली त्यामुळे ह्या काळात अनेक मराठे घराणी उदयाला आली त्यात भोसले हे एक होते. मालोजी हा मुर्तुझा निजामशहाच्या काळात निजामशाहीत नोकरीस लागला असे उल्लेख आहेत. ह्यांच्यानंतर निजामशाहीत बंडाळी माजली व त्यामुळे आदिलशाही व निजामशाही ह्यांच्यात तंटे होऊ लागले. शके १४९९ म्हणजे सन १५७७ मध्ये मालोजीस निजामशाहीत मनसब मिळाली, पण ती कितीची होती व त्याला काही जहागीर मिळाली का ह्या बद्दल काहीच स्पष्टता नाही.
क्रमशः

Comments
Post a Comment