शिवचरित्र निबंधावली भाग - २
निजामशाहीतील धामधूम-
निजामशाहीतील गादीची मालकी एकाच घराण्याकडे असावी ह्यावर एकमत असल तरी त्यांच्यातील कोणी गादीवर बसायचे ह्यावर काहीच नियम नसल्याने दरबारातील गटांमध्ये यांवरून कायम झगडे होत. अशी परिस्थिती मध्ययुगात सर्वत्रच होती, अगदी मराठेशाहीत सुद्धा ह्यावरून संघर्ष झाले त्यामुळे ह्या स्थितीत काहीच नावीन्य नाही. प्रत्येक गटाला त्यांच्या पसंतीचा बादशहा हवा असल्याने त्यांचे इतर गटांशी नेहमीच भांडण होई व त्यातून रक्तरंजित संघर्ष सुद्धा होत. आदिलशाहीतील वजीर दिलावर खानाने आदिलशहाच्या बहिणीचे मुर्तुझा निजामशहाच्या मुलाशी म्हणजे हुसेनशी लग्न करण्याचे ठरवले पण निजामशहा सुरुवातीला तयार झाला नाही पण त्यातून आदिशही व निजामशाहीत युद्ध सुरू झाले शेवटी निजामशहा तयार झाला पण त्याने आपल्या मुलाचाच काटा काढण्याचे ठरवले. एके दिवशी हा मुलगा झोपलेला असताना त्याने त्याचा पलंग पेटवून दिला पण हा हुसेन त्यातून बचावला. त्याने ह्या प्रकरणाचा सूड म्हणून आपल्या बापालाच आधणाच्या हाडयात बुडवून मारले व स्वतः बादशहा बनला. त्याच्या क्रूरपणामुळे लवकरच त्याचा खून झाला व निजामशाहीत यादवी माजली. यात जमलखां नावाच्या सरदाराने हुसेनचा पुतण्या इस्माईल यास बादशहा बनवून स्वतः वजीरपद धारण केले. पण गंमत म्हणजे ह्या इस्माईलचा बाप बुऱ्हाण हा अकबराच्या आश्रयाला गेला होता. जमाल हा महादावी पंथाचा असल्याने त्याच्या विरोधात शिया व सुन्नी ह्या दोन्ही गटांनी उठाव केले. त्याचवेळी बुऱ्हाण ह्याने खान्देशचा राजा अलीखान व आदिलशहा ह्यांची मदत घेऊन जमलखां वर चढाई केली. ह्यात जमलखानाने अदिलशहाचा पराभव केला पण उत्तरेच्या सैन्याचा त्याला पराभव करता आला नाही ह्यातच रोहणखेड येथील लढाईत जमलखां मारला गेला व बुऱ्हाण बादशहा बनला त्याने इस्माईल ला कैद केले. इस्माईल महादावी पंथाचा आश्रय सोडत नसल्याचे पाहून त्यास ठार मारले, यामुळे दक्षिणी सरदार साशंक झाले व त्यांनी बादशहा विरुद्ध उठाव सुरु केले व ह्या उठावाचा बिमोड करत असतानाच बुऱ्हाणचा मृत्यू झाला. ह्या नंतर दक्षिणी सरदारांच्या हाती सर्व सूत्रे आली. त्यांच्यातही नेमस्त ,जहाल व हबशी असे भेद असल्याने त्यांच्यातील भांडणात नवीन बादशाहा देखील मारला गेला. ह्यानंतर चार निरनिराळ्या सरदारांनी चार निजामशहा उभे केले व आपसांत भांडू लागले ह्यातील एकाचे मुघलांची मदत मागितली. अकबरानेही संधी साधून निजामशाहीवर आक्रमण केले. ह्यात चांदबिबीने थोडा काळ मुघलांशी सामना दिला पण पुढे तिचाच खून झाला व मुघलांनी बहादुरशहा निजामशाहास कैद केले व अहमदनगर जिंकले.
मालोजीची निजामशाहीतील कामगिरी-
ह्या सर्व अंतर्गत झगड्यांच्या काळात सर्वच पक्षातील लोकांना मराठा सरदारांच्या मदतीची गरज होती. त्यामुळे अनेक पराक्रमी मराठा घराणी उदयास आली त्यापैकी भोसले एक होते. आपल्याकडे जवळपास सर्वच कथा- कादंबऱ्या यांमधून ह्या झगड्यांचे चित्रण हिंदू- मुसलमान संघर्ष असेच केले आहे हे साफ चुकीचे आहे. हा मुळातला अंतर्गत यादवीचा भाग होता. हिंदू - मुसलमान यांचे संबंध विकोपाला गेले नव्हते कारण मालोजीने शहाशरीफ ह्या मुसलमान संताच्या नावावरून आपल्या दोन्ही मुलांची नावे सहजी व शरीफजी अशी ठेवली होती. मालोजी हा शके १५०२ च्या आसपास निजामशाही सरदार बनला त्याच्या नावाचे शके १५१८ सालचे निजामशाही फर्मान उपलब्ध आहे. हे फर्मान बणगोजी निंबाळकर ह्याच्या पुंडावा संबंधी आहे हा पुंडावा शके १५१७ ते १५३२ इतका काळ चालला होता. ह्या बणगोजी चा मालोजींशी काही संबंध होता का ? ह्याची काही माहिती काळात नाही. मालोजीच्या बायकोचे नाव बखरींमध्ये दीपाबाई असे येते पण शिवभारत, राधा - माधव विलास चंपू ह्यांत ते उमाबाई असे येते शहाजीही आपल्या आईचे नाव उमाबाई असल्याचे एका पत्रात सांगतो ही उमाबाई निंबाळकर घराण्यातील होती. सन १६०३ मध्ये चांदबिबीचा खून झाल्यानंतर मुघलांनी अहमदनगर जिंकले व निजामशाहास कैद केले. पण मलिकअंबर व मियाराजू ह्या दोन सरदारांनी नवा निजामशहा उभा करून निजामशाहीचे पुनरुज्जीवन केले. ह्या नव्या बादशहाचे नक्की नाव कळत नाही. मालोजी व विठोजी यांस 'सर्वगुऱ्हो' हा 'किताब व जाफराबाद, दौलताबाद व करनाड परगण्यांचा मोकासा मिळाल्याचे श. १५२८ चे पत्र सांगते. मालोजी हा श. १५२८ च्या आसपास इंदापूर च्या लढाईत मारला गेल्याचे उल्लेख आहेत.
क्रमशः

Comments
Post a Comment