इतिहास - मिथकं वास्तवता

इतिहास म्हटलं कि आपल्याकडे आठवते ती फक्त अस्मिता. प्रत्येक समाजाची अस्मिता हि त्यांच्या त्यांच्या इतिहासाशी जोडलेली असते. पण ह्या सगळ्यात इतिहास हे एक शास्त्र आहे त्याचा शास्त्र म्हणूनच अभ्यास केला पाहिजे तो अभ्यास करत असताना तो तितकाच निःपक्षपातीपणे व्हायला हे सगळेच विसरतात. आणि ह्याच कारणामुळे आज सगळ्यात विद्रुप होत चाललेली गोष्ट म्हणजे आपला इतिहास होय.
आपल्याकडे इतिहास ह्या गोष्टींचा हवतास वापर होतो आता आपला मराठ्यांचा इतिहास घ्या. आजवर कित्येक महान इतिहासकारांनी आपल्या इतिहासाचे संशोधन करून  त्यावर अनेक प्रकारची व्याख्याने तसेच निबंधमाला प्रकाशित करून इतिहास इतिहास संशोधन ह्या गोष्टीबद्दल जागृती  निर्माण केली पण त्यानंतर प्रत्येक गोष्टीत नेहमीप्रमाणे राजकारण शिरलं  आनि सगळ्याचाच बट्याबोळ झाला. आपल्या प्रत्येक ऐतिहासिक पुरुषास कुठल्याना कुठल्यातरी समाजाने वाटून घेतले आहे आणि ह्या सगळ्या भांडणात आपल्या पद्धतीने इतिहास लिहिण्यामुळे नेमका खरा इतिहास कोणता तेच कळत नाही. छत्रपती शिवाजी हे नाव महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या मनाजवळचं नाव पण त्यांना देव बनवण्याच्या नादात ते एक ऐतिहासिक पुरुष होते  तत्कालीन सर्वच राज्यकर्यांप्रमाणे ते एक धूर्त राजकारणी होते त्यामुळेच ते तश्याच असलेल्या औरंगजेबालाही पुरून उरले. हे सर्वच जण विसरतात सोयीस्करपणे विसरतात हे सर्वात वाईट आहे. त्यांच्या नावावर जितक्या कथा पिकवल्या जातात तितक्या कोणावरच नाहीत आता त्यांच्या आयुष्यात घडलेल्या कित्येक घटनांचे नव्याने संशोधन व्हायची गरज आहे इतकी त्यावर पुटं चढली आहेत. त्यामुळेच ऐतिहासिक आधार नसलेली मदारी मेहतर ( जिज्ञासूंनी सभासद बखर शिवकालीन . सा. सं. वाचावी  ) , पावनखिंडीची लढाई ( जिज्ञासूंनी शिवभारत सभासद बखर वाचावी), कल्याणच्या सुभेदाराची सून . गोष्टी ह्या फक्त इतिहासाचाच नव्हे तर आपल्या पाठ्यपुस्तकांचा   भाग बनल्या आहेत ह्या कडे कोणाचेच लक्ष नाही. तशीच गत पहिल्या बाजीराव पेशव्याची शिवाजी ब्राह्मणेतरांचा बाजीराव ब्राम्हणांचा अशी ढोबळ विभागणी काहीही कारण नसताना झाली आहे पण त्यामुळे बाजीरावाच्या आयुष्यातील इतर प्रकरण बाजूला राहून फक्त मस्तानी प्रकरणाचाच गवगवा  होतो. कमी अधिक फरकाने आपल्या प्रत्येक ऐतिहासिक पुरुषाची प्रत्यक्ष ऐतिहासिक घटनेची आहे. आणि ह्यावर सर्वात महत्वाची चिंतेची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीवर होत असलेले राजकारण मूलभूत संशोधनात दाखवली जाणारी घोर अनास्था ह्या दोन्ही गोष्टींमुळे सर्वच गोष्टीची माती झाली आहे.
हे सर्व बदलायलाच हवं कारण इतिहास हि गोष्ट वर्तमान भविष्य ह्या सर्वांवरच खूप प्रभाव टाकत असते. त्यामुळेच त्याचं   नीट काळजीपूर्वक संशोधन जतन करून ठेवायला हवं खरा इतिहास सगळ्यांसमोर यायला हवा आलेला खरा इतिहास राजकारण निरर्थक भांडण करता स्वीकारायला हवा.
इतिहास हि खूप गांभीर्याने घ्यायची गोष्ट आहे हे समजायला हवं  आणि त्याचं विद्रुपीकरण  थांबायला हवं कारण ह्याची फळे  आज नाहीतर उद्या आपल्याकडेच येणार आहेत हे आपण लक्षात घ्यायला हवं.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog