इतिहास संशोधन आणि मी
इतिहास संशोधन म्हटलं कि
अनेकांच्या पोटात गोळा येतो.
पण मला लहानपणापासून
ह्याच गोष्टीचा जास्त
आकर्षण वाटते. लहानपणापासून मी
आपल्या मराठीतील सर्व ऐतिहासिक
कादंबऱ्या मराठी रियासत चे
सर्व खंड, बाबासाहेब पुरंदरे यांचे राजा शिव
छत्रपती इ. पुस्तके
मी आवडीने वाचत
आलो आहे. सध्या
लॉकडाउन च्या काळात
माझ्या वाचनात एक पुस्तक
वाचनात आला ते
म्हणजे शिव चरित्र
निबंधावली. त्यानंतर मी माझे
ह्या क्षेत्रातील मार्गदर्शक
संजय क्षीरसागर सरांशी
चर्चा केली आणि
एक धाडसी उपक्रम
हाती घेत आहे तो
म्हणजे ह्या शिव चरित्र निबंधावली वर एक
लेख मालिका लिहिण्याचा.
कितपत जमेल माहित
नाही पण ह्यासाठी
मी प्रामाणिक प्रयत्न
करणार आहे. इतिहास
संशोधन हा एक
नवा प्रांत आहे
कारण आपल्याकडे इतिहास
हि खूप संवेदनशील
पण तितकीच जास्तीत
जास्त विकृत केलेली
गोष्ट आहे त्यामुळे
खूप सांभाळून लिहावं
लागणार आहे. ह्यात
एकाच दृष्टिकोन ठेवण्याचा
प्रयत्न मी करणार
आहे तो म्हणजे
निःपक्षपाती लेखन करण्याचा.
मराठी इतिहासाकडे ह्या
दृष्टिकोनातून खूपच कमी
वेळा बघितले गेले
आहे त्यामुळे अशी
एखादी लेखमालिका लिहावी
कि ज्यात खरोखरच असा दृष्टिकोन
ठेवण्याचा प्रयत्न असेल हे
नक्की. सध्या वाचन चालू
आहे पण थोड्याच
दिवसात ह्या लेखमालिकेला
सुरुवात करू शकेन
हीच आशा.
धन्यवाद
चांगला उपक्रम आहे. तुला खूप शुभेच्छा
ReplyDelete