आर्थिक
मंदी - वास्तव कि आभास
आज संपूर्ण देशातील सर्वात जास्त चर्चिला जाणारा मुद्दा आहे आर्थिक मंदी. भारतातील सर्वात जास्त जास्त अस्वस्थता पसरवणारा मुद्दा म्हणून पण त्याकडे बघता येईल सरकार जवळपास दर आठवड्याला नवीन उपाययोजनांची मालिका जाहीर करत आहे. रोज वर्तमानपत्रांमधून, वृत्तवाहिन्यांमधून सर्वच ठिकाणांहून मंदी व त्याची करणे , त्यावरचे उपाय यांची चर्चा होताना दिसते. काहींच्या मते देशात मंदी नाहीच असली तर ती फक्त देशाबाहेरील कारणांमुळे आहे आणि ती भारतासाठी एक महत्वाची संधी आहे. तर काहींच्या मते देशात खरोखरीच चिंतेचे वातावरण आहे आणि त्याला देशातील व देशाबाहेरील अशी दोन्ही कारणं
आहेत आणि ह्यांवर लवकरात लवकर उपाय योजावे लागतील. ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हि लेखमालिका ह्या मालिकेच्या ह्या पहिल्या लेखात आपण फक्त आर्थिक मंदी म्हणजे काय? आपल्या देशात खरोखरच मंदी आहे काय? ह्या मुद्द्यांचा विचार करू. सर्वात पहिले हे सांगूनच टाकले पाहिजे की लेखक कोणी मोठा अर्थतज्ज्ञ नाही तो फक्त एक अर्थशास्राचा सामान्य विद्यार्थी आहे त्यामुळे आपल्या आकलनातून ह्या मुद्द्यांकडे पाहू बाकी ह्यावर सविस्तरपणे अर्थतज्ञ बोलतीलाच व बोलतही
आहेत.
सर्वात
पहिले आर्थिक मंदी म्हणजे नेमकं काय? हे आधी बघूया, बाजारात महागाई असते हे सर्वांनाच माहित आहे पण बाजारात मंदी आहे हे कसं ओळखायचं ह्याचं एक सामान्य उदाहरण पाहू. समजा एक कुटुंब आहे ज्यात पती- पत्नी व दोन मुले असे चार सदस्य आहेत व यातील एकच माणूस कमावताआहे व ज्याचं मासिक उत्पन्न हे ३००००रु. आहे जर अशी व्यक्ती बाजारात गेली व समजा बाजारात भाज्यांचा दार हा किलोमागे ४०रु. चालू आहे तर तो ह्या कुटुंबाला परवडू शकतो पण जर हाच दर किलोमागे ६०रु. किंवा त्याच्यावर गेला तर मात्र ह्या कुटुंबाला ते परवडेलच असे नाही हे झाले महागाईचे उदाहरण .
महागाई
तेव्हाच होते जेव्हा मागणी असूनही पुरवठा कमी होतो किंवा उत्पादनाचा खर्च वाढतो तेव्हाच महागाई येते पण येथे थोड्याफार प्रमाणात का होईना मागणी अस्तित्वात असते पण मंदीच्या बाबतीत असे होत नाही ह्या परिस्थितीत मागणीच कमी होते व कितीही किंमत खाली आली तरी मागणी उभार घेत नाही अशी काहीतरी परिस्थिती तयार होते. आता उदाहरण ह्यायचंच झालं तर वाहन उदयॊग घेऊ समजा एखादी चारचाकी गाडी वर उल्लेख केलेल्या कुटुंबाला जर विकत घ्यायची असेल व समजा एका चारचाकीची किंमत २ लाख रु. पासून चालू असेल तर कदाचित परवडू शकेल पण नुसती गाडी विकत घेऊन भागत नाही त्यासाठी पेट्रोल, पार्किंग तसेच त्याचा
उपयोग ह्या सर्व गोष्टी विचारात घेता गाडी घेणे हे वर उल्लेख केलेल्या कुटुंबाच्या आवाक्यात राहिलाच असे नाही परिणामी गाड्यांची मागणी मंदावते. त्याचवेळी गाड्यांचे उत्पादन कमी झालेले नाही पण विकत घेणारच कोणी नसेल तर काय करणार?
समजा कर्ज काढून जरी हे करायचे म्हटले तरी ते परवडत नाही त्यामुळे २ लाख इतक्या कमी किंमतीतील गाडीसुद्धा आवाक्याबाहेर जाते. हे झाले एकाच कुटुंबाचे जर संपूर्ण देशाचा विचार केला तर किती मागणी मंदावली आहे हे लक्षात येते. त्याचमुळे आपल्याला वाचायला मिळते कि टाटा मोटर्स ने एका आठवड्यासाठी उत्पादन बंद ठेवले पाठोपाठ महिंद्रा ने सुद्धा तेच केले. हे झाले फक्त वाहन उद्योगाचे तशीच परिस्थिती घर बांधणी क्षेत्राची. घरे बांधून तयार आहेत बँकासुद्धा कर्ज द्यायला तयार आहेत पण घर व त्याच्या औषंगाने येणारे इतर मुद्दे म्हणजे घराचा आकार, त्यात असलेल्या सोयी, तिकडे राहणं परवडणे इ. ह्या गोष्टींमुळे
व सामान्य मध्यमवर्गाचं मासिक उत्पन्न ह्यांचा कुठेच मेळ बसत नाही त्यामुळे घरे विकलीच जात नाहीत. आणि आता ह्या दोन उद्योगांबद्दल जास्त बोलण्याचे कारण म्हणजे त्यांवर अवलंबून असणाऱ्या उद्योगांची साखळी त्यामुळे बाजारातील मोठा हिस्सा हा मंदीच्या छायेत आहे. त्यामुळे ह्या उद्द्योगांचा गांभीर्याने विचार करायला हवा.
ह्या सर्व चर्चेचा हेतू म्हणजे भारतात सध्या मंदी
आहे हे स्पष्ट करून सांगणे. भारतातील मंदीची अनेक करणे असू शकतील त्यामध्ये देशातील व देशाबाहेरील अश्या दोघांचाही समावेश होतो त्यांवर पुढील लेखांत चर्चा करूच, लेखकाचा असा कुठेही दावा नाही कि वरील विवेचन हे पूर्ण योग्यच आहे हे त्याचे स्वतःचे आकलन आहे ह्यावर एक साधक बाधक चर्चा व्हावी व त्यातून आपल्या समाजाची दृष्टी बदलण्याची आशा तयार होईल.
Right Analysis
ReplyDelete