लोकमान्य टिळक- एक अभ्यास
यंदाचं
वर्ष हे लोकमान्य टिळकांचा स्मृतिशताब्दी वर्ष. भारताच्या इतिहासातील खऱ्या अर्थाने लोकनेतृत्व असणारे व्यक्तिमत्व म्हणजे टिळक. लोकमान्य टिळक एक अभ्यास हे शीर्षक देण्याचा मुख्य कारण म्हणजे आजच्या राजकारणात म्हणा किंवा समाजकारणात म्हणा कुठेतरी एक सुसंस्कृत विचार हरवत चालले आहेत त्या पार्श्वभूमीवर आपल्याच इतिहासातील एका लोकमान्य लोकनेत्याचा अभ्यास करून त्यांची तत्वे आत्मसात करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.
टिळकांच्या राजकीय व सामाजिक जीवनाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ती न्यू इंग्लिश स्कूल च्या स्थापने पासून. चिपळूणकर, आगरकर, टिळक ह्या तिघांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या स्थापने बरोबरची ह्या तिघांनी आपले विचार सुद्धा मांडायला सुरुवात केली. टिळकांचे ह्या काळातील विचार कसे होते हे न. चिं. केळकर यांनी लिहिलेल्या त्यांच्या चरित्रात स्पष्ट दिसून येतात. टिळकांनी ह्या काळापासूनच सामाजिक सुधारणा वगैरे बाजूला ठेवून स्वराज्य व राजकीय सुधारणा ह्यांनाच प्राधान्य द्यायला सुरुवात केलेली दिसते. त्यामुळेच राजकीय अस्मिता महत्वाची असल्याने त्यांनी कोल्हापूरच्या चौथा शिवाजी प्रकरणी दाखवलेली कणखरता व वैचारिक प्रखरता हि त्याचाच उदाहरण ठरते. त्या गोष्टीवरून झालेला तुरुंगवास हि त्याची मोजलेली पहिली किंमत. त्यानंतर टिळकांच्या डेक्कन एज्युकेशन च्या राजीनाम्याचा प्रकरण येतं. दोन वेगळ्या विचारांची दोन प्रखर माणसे कधीच फार काळ एकत्र राहू शकत नाहीत. त्याचप्रमाणे टिळक -आगरकर यांचा झालं. टिळकांच्या आयुष्यातील हा दुःखद काळ आहे ते दोघे एकत्र खूप काही करून दाखवू शकले असते पण तसं व्हायचं नव्हतं. ह्यानंतर टिळकांनी राजकारणच आपलं धेय्य मानला व त्यातून गणपती व शिवजयंती उत्सव सुरु झाले. टिळकांच्या राजकीय दूरदृष्टीची तारीफच करायला हवी कारण लोकभावनेचा इतका अचूक उपयोग त्यांच्या नंतर कोणाला जमलंच नाही असं दिसत अगदी गांधींचा चरखा सुद्धा ह्याच्या जवळ सुद्धा जाऊ शकला नाही.
ह्याचनंतर टिळक खऱ्या अर्थाने लोकनेते बनले. त्यांना ह्या काळात मिळालेली तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी हि पदवी सार्थच वाटते. टिळकांच्या आधी एवढी प्रसिद्धी कोणाला मिळाली असं वाटत नाही. लोकभावना व स्वतःचे विचार यांची इतकी सुरेख गुंफण फक्त टिळकांनीच केली. टिळकांच्या ह्याच प्रयत्नांनी राष्ट्रीय चळवळ घराघरात पोचली. ह्यानंतर टिळकांच्या आयुष्यातील अजून एक अनाकलनीय प्रसंग म्हणजे वेदोक्त प्रकरण. हे प्रकरण का घडलं ह्या पेक्षाही ह्यातून सध्या काय झालं हे विचार करण्या सारखं ठरेल. विषयांतर होईल म्हणून हे पूर्ण देता येत नाही पण ह्यातून उगीच टिळकांवर सनातनी असल्याचा आरोप झाला. ह्याच घटनेतून शाहू महाराजांचे नेतृत्व उदयाला आले आणि विशेष गोष्ट म्हणजे शाहू महाराज ज्यांचे दत्तक पुत्र होते त्या चौथ्या शिवाजींचा टिळकांनी पहिला तुरुंगवास भोगला होता.
ह्यानंतरचे टिळकांचे जीवन म्हणजे निव्वळ राजकारण आहे १९०८ चा राजद्रोहाचा खटला हा त्यातील सर्वोच्च अध्याय. ह्या सर्वच घटनांतून टिळकांचे नेतृत्व उजळून
गेले. टिळकांच्या आयुष्याच्या अनंताच्या काळात गांधींचे नेतृत्व पुढे येऊ लागले होते व टिळकांनी मोठ्या मानाने त्यांना पुढे वाट करून दिली होती .
टिळकांनी सुद्धा तत्कालीन नेत्यांप्रमाणे आर्थिक विचारांची मांडणी केली होती. त्यांच्या आर्थिक विचारांचे थोडक्यात सार
म्हणजे त्यांनी दिलेला चतुःसूत्री कार्यक्रम. टिळक भारताच्या आर्थिक सुधारणांसाठी आग्रही होते व त्यांनी पुढाकार घेऊन स्वदेशी उद्योगांना मदत सुद्धा केली होती.
टिळक सर्वच विचारधारांमध्ये लोकप्रिय होते अगदी खिलाफत चळवळीचे अली बंधू सुद्धा त्यांना गुरु मनात असे वाचनात आले आहे पण पुरावा नसल्याने ते देत नाही. कित्येक क्रांतिकारकांचे टिळक हे स्फूर्तिस्थान होते व कित्येकांना टिळकांनी मदत सुद्धा केली होती त्यात चाफेकर ते सावरकर अशी मोठी यादी आहे क्रांती मार्गावर आपली श्रद्धा नाही हे उघड बोलून सुद्धा त्यांनी क्रांतिकारकांच्या प्रामाणिक प्रयत्नांचे कौतुक केले व मदत सुद्धा केली.
सामाजिक
बाबतीत टिळकांचा दृष्टिकोन स्पष्ट दिसतो त्यांनी सुधारणांकडे फारसे लक्ष न देता रूढी- परंपरांचे अवास्तव स्तोम माजू दिले नाही इतकेच उदा. टिळकांनी सुद्धा बायकांचे केशवपनास विरोध केला होता.
टिळकांचे चरित्र नुसत्या काही शब्दांत मांडणे अवघड आहे जिथे केळकरांनी तीन खंड लिहिले तिथे हा एवढासा लेख कसा पुरणार. पण आज टिळकांसारख्या नेत्याची गरज आहे त्यांच्या सारखी विचारधारा असणे गरजेचे आहे. टिळक खऱ्या अर्थाने लोकनेते होते आजही तश्याच नेत्याची गरज आहे. आजच्या नेतृत्वाने टिळक समजून घेऊन त्यांच्या प्रमाणे आचरण करणे गरजेचे आहे व राष्ट्राला खंबीर नेतृत्व देण्याची गरज आहे आजच्या अस्थिर व अशांत वातावरणात टिळकांच्या चरित्रातून मार्ग शोधण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.
Aaj ashya netyachi garaj ahe, agadi barobar ahe, aaj kharach ashya netyachi garaj ahe
ReplyDeleteछान लिहिलयस!
ReplyDeleteकेवळ गरज आहे म्हणून थांबूया नको तर ते गन ती दूरदृष्टी स्वतः शिकून घेऊन ते नेतृत्व आपणच बनणे त्यासाठी झगडणे महत्वाचे!
असाच लिहित राहा!
खूप खूप शुभेच्छा!
समीर दिघे
संवेदन
thank you sir
DeleteVery well written !
ReplyDelete