स्वातंत्र्य लढ्या पासून आपण काय शिकलो?
      यंदा आपण आपल्या स्वातंत्र्याच्या ७३व्या वर्षात पदार्पण केले . या पार्शवभूमीवर आपल्या आजच्या स्थितीचा विचार करणे त्याचा इतिहासात कुठे संदर्भ मिळतो का ह्याचा विचार करायला हवा. ह्याचं   कारण म्हणजे आपल्या 'आज ' चा विचार करताना त्याची मुळे  इतिहासात आहेत ह्याचा आपल्याला विचार  करायला हवा. 
   आपल्या स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी योगदान दिले. अनेक महान नेत्यांच्या तसेच लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आपल्या स्वातंत्र्य लढ्याला यश प्राप्त होऊन आपले पारतंत्र्य गेले. पण ह्या सगळ्या गोष्टींचा उदोउदो करताना आपण एक गोष्ट मात्र  विसरलो ती म्हणजे आपल्या स्वातंत्र्य चळवळी बरोबर झालेल्या  सामाजिक आर्थिक सुधारणा, आज त्याचाच जास्त विचार होणं गरजेचं आहे कारण आता उभ्या असलेल्या आव्हानांचा सामना करायचा असेल तर आपल्याला ह्याच गोष्टीची जास्त गरज आहे.
            पहिले येऊ आर्थिक बाबींकडे. आप;या स्वातंत्र्य लढ्याच्या सुरुवातीपासूनच भारतातील तत्कालीन नेत्यांनी आपल्या भारताच्या आर्थिक सुधारणांसाठी प्रयत्न केले. ब्रिटिशांच्या शोषणाचे व्यवस्थित विश्लेषण करून ते चित्र बदलण्यासाठी आपण स्वतःहून प्रयत्न करायला हवेत हे विचार त्याकाळी जोरदार पणे मांडले गेले. दादाभाई नौरोजी यांनी त्यांच्या drain of wealth  ह्या ग्रंथात ब्रिटिश कसे शोषण करत आहेत हे नीट स्पष्ट करून सांगितले. त्या काळात झालेल्या चर्चा आपण आभ्यासायलाच हव्या कारण नंतर स्थापन झालेले नियोजन आयोग,  नीती आयोग ह्यांची मुळे  ह्यातच आहेत. त्या काळात शेतीवरच्या सुधारणांचा खूप विचार केला गेला. त्यात शेतीती गुंतवणूक वाढायला हवी त्याच बरोबर संशोधनही वाढायला हवे असेही म्हटले गेले. त्याची आज जास्त गरज आहे. औद्योगिक सुधारणां साठीही खूप प्रयत्न केले गेले त्यातला सामान धागा म्हणजे स्वदेशी उद्योग स्वदेशी भांडवल स्वदेशी उदयोजक यांना प्रोत्साहन दिले पाहिजे हा. आपल्या कडे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला नवे भारतीय उद्योजक उभे राहिले त्यातील महत्वाचा नाव म्हणजे जमशेदजी टाटा. भारतात  हे एक स्वदेशी उद्योगांचं  एक मोठा जाळंच तयार व्हायला पाहिजे असा प्रत्येकाचंच मत होतं. आज देश आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर उभा आहे त्यामुळे त्यातून बाहेर पाडण्यासाठी अश्याच वास्तववादी  उपायांची गरज आहे. 
          आता सामाजिक बाबींकडे वळू. आज भारत जो एक समर्थ  राष्ट्र म्हणून उभा आहे त्याचा सर्व श्रेय ह्या सामाजिक सुधारणांच्या कामाला जातं. आपल्या कडे सर्वात जास्त काम हे सामाजिक सुधारणांवरच झाले भारतातील मागास कालबाह्य समाज पद्धती बदलण्यासाठी जोरदार प्रयत्न केले गेले.
त्यात सामाजिक सुधारणा करताना जातीभेद, अस्पृश्यता  वंचितांचे उपेक्षित जिने सर्वात महत्वाचे म्हणजे स्त्रियांची स्थिती ह्यांवर विपुल काम झाले.
आंबेडकरांसारख्या  नेत्याने वंचितांच्या उद्धारासाठी कायद्याचे संरक्षण मिळवून दिले. फुले , आगरकर यां सारख्यांनी स्त्रियांना बरोबरीचा दर्जा मिळावा या साठी खूप प्रयत्न केले. पण आजही आपण हे सामाजिक अधोगतीचे वास्तव बदलू शकलेलो नाही. आजही स्त्रिया वंचित ह्यांचे जगणे दुःखदायकच आहे.
अय्यप्पा मंदिरातील प्रवेश वरून जो वाद झाला त्यावरून आपण अजूनही किती मागास आहोत अजून किती आम करायचे आहे त्याची जाणीव करून दिली आहे. आपल्या सर्व नेत्यांनी जातीयवाद संपवण्यासाठी काम केले पण आज तोच मुद्दा प्रत्येक ठिकाणी अस्तित्व दाखवून  देतोय त्याचा आपल्या समाजाला एक घट्ट विळखा पडलेला आहे.
वरील सर्व गोष्टीचा वविचार केला तर आज ह्या सर्वच बाबींवर डोळस पाने  विचार करून एक सकारात्मक कृती घडायला हवी. आणि त्या साठी पुन्हा आपल्यालाच पुढे यावे लागेल, कारण आज ह्यां कडे दुर्लक्ष केले तर उद्या ह्याचे परिणाम खूप वाईट होतील ते आपल्यालाच भोगावे लागतील.
आपल्या पूर्वजांनी मार्ग दाखवायचे काम केले आहे आता फक्त त्यावरून चालणे हे एकाच काम निष्ठेने चिकाटीने केले पाहिजे तरच 'भारत माझा देश आहे '
ह्या प्रतिज्ञेला अर्थ उरेल.

Comments

Popular posts from this blog